Ad will apear here
Next
भारतीय भाषांतून आरोग्यविषयक ज्ञानासाठी ‘विकिपीडिया-स्वस्थ’ प्रकल्प
संचालक अभिषेक सूर्यवंशी यांची माहिती


पुणे :
इंटरनेटवर भारतीय भाषांतून आरोग्यविषयक अधिकाधिक लेखन केले जावे, त्या विषयातील जास्तीत जास्त माहिती, ज्ञान इंटरनेटवर यावे यासाठी विकिपीडियाने ‘विकिपीडिया- स्वस्थ’ हा विशेष प्रकल्प सुरू केला आहे. ‘विकिपीडिया-स्वस्थ’द्वारे भारतीय भाषांतून अधिक आरोग्य ज्ञान उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ‘विकिपीडिया-स्वस्थ’चे प्रकल्प संचालक अभिषेक सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली.

‘विकिपीडिया’च्या १९व्या वर्धापनदिनी ही माहिती देण्यात आली. १५ जानेवारीला ‘विकिपीडिया’चा वर्धापनदिन असतो. ‘Special Wikipedia Awareness Scheme For The Healthcare Affiliates – SWASTHA’ असे या प्रकल्पाचे नाव आहे.

आताही आरोग्यविषयक लेखन, माहिती आणि ज्ञान इंटरनेटवर, विकिपीडियावर उपलब्ध आहे; मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. भारतीय भाषांतून आरोग्यविषयक अधिकाधिक ज्ञान विकिपीडियावर यावे, यासाठी विशेष मोहिमेद्वारे विकिपीडिया कम्युनिटी उत्तेजन देणार आहे. इंग्रजीबरोबरच भारतातील हिंदी, मराठी, कन्नड, मैथिली, उडिया, तमिळ, तेलुगू, बंगाली, गुजराती, उर्दू या भाषांतून आरोग्यविषयक लेख विकिपीडियावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. २०२१पर्यंत ५०० मिलियन इंटरनेट युजर्स स्थानिक भाषा वापरू लागतील, असा गुगलचा अहवाल आहे. त्यात भारतीय भाषा आघाडीवर असणार आहेत. भारतीयांचा इंटरनेटवरील इंग्रजीपेक्षा स्थानिक भाषांतील माहितीवर अधिक भरवसा आहे.



अभिषेक सूर्यवंशी म्हणाले, ‘गुगलद्वारे माहिती शोधताना विकिपीडियावरची माहितीदेखील युजर्सना उपलब्ध केली जाते. ही माहिती उपयोगात आणणाऱ्यांमध्ये भारतीय युजर्स आघाडीवर आहेत. इंटरनेटवर शोध घेताना भारतीय युजर्सकडून आरोग्यविषयक माहिती शोधण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच आरोग्यविषयक माहितीचा साठा समृद्ध करण्याचा निर्णय विकिपीडियाने घेतला आहे. ही माहिती भारतीय परिस्थितीशी सुसंगत असले पाहिजे, याची काळजी घेतली जात आहे.’

वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर्स, वैद्यकीय महाविद्यालये, लेखक, पत्रकार, वाचक अशा सर्व स्तरांतील युजर्सना ‘विकिपीडिया-स्वस्थ’वर माहिती देण्यामध्ये लेखन योगदान देता येईल. त्यासाठी देशभर मोफत कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी director@wikiswastha.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(To read this news in English, please click here)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZPXCI
Similar Posts
जाणून घेऊ या प्राणायाम : कपालभाती कपालभाती प्राणायाम : कपाल म्हणजे कपाळ; भाती म्हणजे तेजस्वी किंवा ओजस्वी. म्हणजेच कपालभाती म्हणजे तेजस्वी कपाळ. कपालभाती हा प्राणायाम करताना शरीरातील सर्व संस्थांची सफाई म्हणजेच प्रक्षालन होते. ओजस्वी कपाळ हे उत्तम आरोग्याचे प्रतिक म्हणता येईल. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे केवळ वजन कमी होते, असे नाही, तर संपूर्ण शरीर संतुलित राहते
व्यायामशाळेत होणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष नको! हल्लीच्या अद्ययावत व्यायामशाळा म्हटले, की तिथे स्पिनिंग, झुंबा, पावर योगा, अॅब्स अशा विविध प्रकारच्या व्यायामाच्या बॅचेस असतात. काहीही विचार न करता, कोणाचाही सल्ला न घेता, ‘पैसे वसूल झाले पाहिजेत’, या आवेगात बऱ्याच चुका होतात... यासाठीच ‘पोषणमंत्र’मध्ये आज पाहू या व्यायामशाळेतील चुकांबद्दल...
औषधशास्त्र सांगते... औषधे हा अलीकडे आपल्या दैनंदिन जगण्यातला एक आवश्यक घटक बनला आहे. खरे तर बरेच जण तब्येतीच्या कोणत्याही छोट्या-मोठ्या तक्रारीसाठी हमखास औषध घेताना दिसतात. परंतु तब्येतीच्या छोट्या-छोट्या तक्रारींवर, आपण रोज घेत असलेला आहार हेच एक उत्तम औषध आहे. आपला दैनंदिन आहार, शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची पूर्तता
इंडस्ट्री 4.0 सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language